यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने महात्मा गांधींना आदरांजली

यावल प्रतिनिधी । जगाला अहींसा सत्य आणी सहिष्णुता यांची शिकवण देणाऱ्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली आहे.

यावल येथील यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघात पार पडलेल्या कार्यकमात आज दिनांक ३० जानेवारी रोजी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे तालुका कमेटी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य आर .जी . पाटील ( नाना ) , इंटकचे जळगाव जिल्हा अध्यक्ष भगतसिंग देवनाथ पाटील , काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह , कॉंग्रेस कमेटीचे शहराध्याक्ष कदीर खान , संघाचे व्यवस्थापक शशीकांत गाजरे , संघाचे वरिष्ठ हिशोबनीस सुरेश यावलकर, साकळी येथील सामाजीक कार्यकर्ते गजानन सोनार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिनेचे पुजन करून पुष्पहार अपर्ण करून भावपुर्ण आदरांजली वाहीली .

 

Protected Content