यावल तालुका भाजप युवा मोर्चाची कार्यकारणी जाहीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, भाजप युवा मोर्चाचे जळगांव जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोच्या यावल तालुका अध्यक्ष सागर कोळी यांची पुनश्च फेरनिवड करण्यात आली आहे.

सागर कोळी यांनी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत यावलची तालुकास्तरीय नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नेमणूक करून कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीत तालुका सरचिटणीस योगेश खेवलकर, मयुर पाटील, यावल शहर सरचिटणीस व्यंकटेश बारी, उपाध्यक्ष पदावर रितेष बारी, सचिन चौधरी, दिनेश पाटील, योगेश पाटील, गौरव महाजन, वैभव वकारे, राहूल पाटील, कन्हैया वारके, सुनिल पाटील यांच्यासह सुमारे ३३ पदधिकारी यांची निवड केली आहे. सर्व युवा मोर्चा यावल तालुका नवनियुक्त पदाधिकारी यांचे जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी स्वागत केले आहे .

Protected Content