यावल प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयातील नागरीकांच्या दैनंदीन समस्यांचे निराकरण व्हावे तसेच रुग्णालयाच्या संबंधीत विविध प्रश्न सोडविण्याकरिता शासन मान्यता प्राप्त राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय रूग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, या समितीचे कोरोना संकटकाळात रुग्णांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून संबंधित प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण कल्याण समिती मागील १० वर्षापासुन फक्त नावालाच असल्याचे दिसुन येत असल्याने रुग्णालयात लावलेल्या फलकावरच ही समिती आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच यातील अनेक सदस्य असलेले अधिकारी हे यावल येथे प्रशासकीय सेवेत कार्यरत नसल्याने ही सामिती अस्तित्वात आहे किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी रुग्णांच्या आरोग्याशी निगडीत संबधित प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
ग्रामीण रुग्णालय रूग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली असुन या रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष वाय पी सपकाळे, ( गट विकास अधिकारी यावल ) , उपाध्यक्ष विजयकुमार जयकार ( वैद्यकीय अधिकारी सा . रु . जळगाव ) यांची नांवे दिसत असुन तर सदस्य म्हणुन ९ वर्षापुर्वीच यावलहुन बदलुन गेलेले तहसीलदार कुंदन हिरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आर आर चिरमाडे यांच्यासह काही अधिकारी समिती सदस्य तर सेवानिवृत्त झाले आहे तर काहींच्या बदल्या झालेल्या आहेत. या रुग्ण कल्याण समिती मधील अध्यक्षा पासुन तर सर्व कार्यकारणीतील सदस्य हे यावल येथे शासकीय सेवेत कार्यरत नसल्याने या समितीच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
दरम्यान समितीच अस्तित्वात नाही तर नागरीकांच्या आरोग्यांशी निगडीत समस्या, शासनाकडुन रूग्णालयाच्या देखभाल व दुरुस्ती करीता येणाऱ्या निधीचे काय असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले असुन, रावेरचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी आणी चोपड्याच्या आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी तात्काळ या समितीची पुर्नबांधणी करुन रुग्णांना आपल्या आरोग्या विषयी प्रश्न मांडण्या करीता रुग्णालयाशी संबधीत एक कक्ष उभारणी करावी जेणे करून योग्य उपचाराच्या दिशेपासुन भटकलेल्या रुग्णालयास उपचाराची दिशा मिळेल अशी मागणी असंख्य नागरीक करीत आहे