यावल नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणार

        यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सुमारे तीन वर्षांपासून सुरू असलेले यावल नगरपरिषदचे प्रभारी मुख्यधिकारी राज अखेर शिवसेना शिंदे गटासह ईतर सर्वपक्षीय मागणीच्या पाठपुराव्यामुळे मिळाले असुन नविन कायमस्वरूपी मुख्यधिकारी निशिकांत गवई आज पदाची सुत्रे स्विकारणार असल्याची माहिती नगर परिषद सुत्रांकडून मिळाली आहे.

           यावल नगर परिषद मध्ये गेल्या तिन वर्षापासुन नगरसेवक नाही किंवा शहरवासीयांचे प्रशासनिक पातळीवर प्रश्न सोडविणारे मुख्यधिकारी हे देखील नसल्याने नगर परिषद प्रशासनाचे कारभार वाऱ्यावर सुटल्याचे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान ६० हजार लोकवस्ती असलेल्या यावल नगर परिषद वरचे प्रभारीराज संपुष्टात येवुन कायमस्वरूपी मुख्यधिकारी मिळावा या करीता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांच्यासह काँग्रेस पक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,प्रहार जनशक्ती पक्ष व आदी सामाजिक संघटनानी सातत्याने शासन दरबारी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला शासनाने सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक पदभरली असुन अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

       यावल नगरपरिषदच्या मुख्याधिकारीपदी निशीकांत गवई हे पदाची सुत्रे स्विकारणार आहे. नव्याने रूजु झालेले मुख्यधिकारी गवई यांच्याकडून यावल शहरवासीयांच्या विविध समस्यांचे निराकरण होइल अशा अपेक्षा नुतन मुख्यधिकारी यांच्या कडुन व्यक्त होत आहे.

Protected Content