Home Cities यावल यावल नगरपालिकेच्या प्रचाराला वेग; आमदार अमोल जावळे ‘ॲक्शन मोड’मध्ये, कॉर्नर बैठकीतून मतदारांशी...

यावल नगरपालिकेच्या प्रचाराला वेग; आमदार अमोल जावळे ‘ॲक्शन मोड’मध्ये, कॉर्नर बैठकीतून मतदारांशी थेट संवाद

0
127

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून भारतीय जनता पक्षाने शहरभर प्रचाराची गती अधिक वाढवली आहे. पक्षाचे रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे हे स्वतः ‘अॅक्शन मोड’मध्ये उतरले असून, शहरातील विविध प्रभागांत कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत.

आमदार अमोल जावळे यांनी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार रोहिणी उमेश फेगडे यांच्यासोबत प्रभागानुसार प्रचार दौरे सुरू केले आहेत. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत शहरात त्यांच्या माध्यमातून झालेल्या व सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती मतदारांना दिली. महाजन गल्ली परिसरात आयोजित कॉर्नर बैठकीत त्यांनी नागरिकांना संबोधित करताना यावल शहराचा सर्वांगीण विकास हा भाजपच्या कारभाराचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट केले.

या बैठकीत आमदार जावळे यांनी प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेवक पदाच्या उमेदवार देवयानी धीरज महाजन, तसेच माजी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर फेगडे यांच्यासह शहरातील सर्व भाजप उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. “यावलच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व गरजेचे असून, भाजपच्या उमेदवारांना विजयी करून शहराच्या प्रगतीस गती द्या,” असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.

प्रचार बैठकीस अरविंद देशमुख, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद जिवराम महाजन, यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, मसाका माजी संचालक नरेन्द्र नारखेडे, प्रमोद नेमाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आमदार जावळे यांच्याशी संवाद साधत विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound