यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार सोहळा व विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त नुकतेचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत माहिती अशी की, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधा खराटे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा.एम.डी खैरनार यांनी यावेळी सांगितले की, बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून जीवन प्रेरणा मिळते. त्यांच्या काव्य कर्तुत्वाने त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. तसेच ललिता नागपुरे व कोमल बोरनारे यांनी बहिणाबाईंच्या कविता सादर करून जीवन व कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन यांनी विद्यापीठाचा विकास व विविध अभ्यासक्रम याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी विचार व्यक्त केले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी सारखी निरक्षर स्त्री आपल्या कार्यकर्तृत्वाने खूप मोठ्या स्थानावर आहेत. महाविद्यालय स्तरावर तुम्हाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध असते. त्याचं सोनं करा व स्वतःला विकसित करा. समाजाचे आपण देणे लागतो. सतत समाजासाठी जमेल तेवढी सेवा द्या. निबंध स्पर्धेत अनुक्रमे दिपिका सोनार, वंदना चोपडे व हिना तडवी यांनी यश प्राप्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजू पवारा यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्रा.व्हि.बी. पाटील यांनी मानले. यावेळी डॉ.एस.पी.कापडे, डॉ.पी.व्ही.पावरा, प्रा.आहिरराव, प्रा.ए.पी.पाटील, प्रा.छात्रसिंग वसावे व बहुसंख्य विद्यार्थी हजर होते.