यावल प्रतिनिधी । जिल्हा परिषद व इतर शाळा सुरू झाल्या असुन, चिम़कुल्या विद्यार्थ्यांची किलबिल आणि शाळेची घंटा वाजण्यास आजपासुन सुरुवात झाली आहे. तालुक्यातील १७२ मराठी जिल्हा परिषद शाळा तर ३८ उर्दू माध्यच्या शाळा असुन उर्वरीत अनुदानीत शाळा अशा प्रकारे एकुण २४२ शाळा तालुक्यामध्ये आहेत.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील हिंगोणा येथील जिल्हा परिषदच्या शाळेत आज सकाळीच विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी शाळेच्या आवारात दिसुन आली. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तके वितरीत करुन गुलाबपुष्पांने स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हेमंत बोरोले व शाळेचे उपशिक्षक केतन महाजन, शिक्षीका सुनिता बोरोले, छाया वायकोळे, यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान रुम (लोहार) तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व पालकवर्गातून पत्रकार रणजीत भालेराव, अरमान तडवी, प्रकाश कुंभार, प्रशांत मोरे, कुंदन तायडे, यादी मान्यवरांच्या उपस्थितीत तर सर्व मान्यवरांकडुन पुढील शैक्षणिक वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आला.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेत देखील शाळेचे मुख्याध्याक हाजी युसुफ अली यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवुन स्वागत करून त्यांना पुस्तके वाटप करण्यात आली, यावेळी मुख्याध्यापक हाजी युसुफ अली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्व पटवुन दिले, यावेळी उपस्थित असलेले सरपंच भुषण भोळे यांना १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन शाळा परिसराला संरक्षण भिंत बांधून मिळावी अशी मागणी केली, उर्दू माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख मुख्तार शेख, उपाध्यक्ष शब्बीर खान सरवर खान, सिकंदर तडवी, मेहरबान तडवी यांच्यासह मुख्याध्यापक हाजी युसुफ अली, शिक्षक जे. वी फारूकी, सलाउद्दीन फारूकी, सेय्यद अली मोहमंद, सैय्यद मुक्तार अली, सैय्यद शफीक जनाब यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.