यावल गट साधन केद्र सांस्कृतिक स्पर्धां

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील सातोद रोडवरील तहसीलदार कार्यालय जवळील गट साधन केंद्र यावल मध्ये दिनांक 5 जानेवारी २०२५ या दिवशीय महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव व यावल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अधिकारी कर्मचारी व शिक्षक यांच्यासाठी या सांस्कृतिक स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.

गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके क्रीडा समन्वयक मुख्याध्यापक किशोरकुमार पाटील अखिल प्राथमिक शिक्षक संघ यावल चे अध्यक्ष श्रीकांत मोटे यांच्या उपस्थिती सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले मुख्याध्यापक के. यु. पाटील यांनी प्रास्ताविक करून आयोजनाचे महत्व सांगितले तर गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी स्पर्धेत घेतलेल्या स्पर्धाकाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व माहिती देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी बारी यांनी केले या क्रीडा स्पर्धेत विविध गिताचे गायन, नृत्य प्रकार नाटीका करण्यात आले. यामध्ये गीतमध्ये धिरज तायडे, व शिल्पा नेहते, याचा प्रथम क्रमांक आला तर नृत्य मध्ये प्रविण पाटील,व प्रज्ञा कढाणे यांचा प्रथम क्रमांक आला. या स्पर्धा मोठ्या उत्साहाने तालुक्यातील जि. प. शाळेतील शिक्षक व पंचायत समिती चे अधिकारी कर्मचारी यांच्या संघा ने या स्पर्धेत सहभाग नोंदविला स्पर्धा घेण्यासाठी तसेच विविध शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका गट साधन केंद्र चे शिक्षक यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले शेवटी समारोपीय कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, मुख्याध्यापक के यु पाटील यांनी विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करून जिल्हास्तरावर जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या

Protected Content