महायुतीचे उमेदवार अमोल जावळेंच्या प्रचार रॅलीला यावल शहरवासियांचा प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला असुन येथील रावेर यावल विधानसभा निवडणुकीतील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ यावल शहरातुन रॅली काढण्यात आली. या रॅलीला सर्व पातळीवरून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसुन येत आहे. होम टू होम झालेल्या या प्रचारात उमेदवारास मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे संकल्प केले आहे.

यावल शहरातील भुसावळ मार्गावरील श्री स्वामीनारायण मंदीरात देवदर्शन व पुजा अर्चना करुन उमेदवारअमोल जावळे यांच्या प्रचारार्थ महाजन गल्ली,सुतार वाडा, म्हसोबा मंदीर परिसर शहरातील बोरावल गेट ते बुरूज चौक या पारिसरातुन निघालेल्या महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचार रॅलीत भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ उल्हास पाटील, भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जळगाव जिल्हा सरचिटणिस डॉ कुंदन फेगडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद जिवराम महाजन , यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,फैजपुर शहराचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग सराफ, यावल खरेदी विक्री संघाचे चेअरमन नरेन्द्र नारखेडे,भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष राहुल बारी, किशोर कुलकर्णी,पुंडलीक बारी, युवा मोर्चाचे भुषण फेगडे , रितेष बारी यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षाचे पदधिकारी या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते .

Protected Content