यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातून जाणार्या अंकलेश्वर ते बर्हाणपूर महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून माजी शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत याच्या दुरूस्तीची मागणी केली आहे.
तीन राज्यांना जोडणारा एकमेव बर्हाणपुर ते अंकलेश्वर या राज्यमहामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे वारंवार अपघातात मध्ये वाढ झालेली आहे. यामुळे वाहनधारकांची वाहने व हाडे खिळखिळी झाली असुन वाहनधारंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या राज्य महामार्गावर वाहनधारकांना कुठलेच वाहन व्यवस्थितपणे चालवता येत नाही अशी अवस्था झाली असुन जागो-जागी फूटभर खड्डे पडलेले असुन या मुळे वाहन चालवावे तरी कसे ? असा प्रश्न प्रत्येक वाहन धारकांना पडत आहे. खरं तर, पूर्ण महामार्गाचे उच्चप्रतिचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. या हायवेवर पडलेल्या खड्यामुळे दयनिय अवस्था झाली असुन.या मार्गावर पडलेल्या खडयांचे ठिक-ठिकाणी ठिगळ जोडण्याचे काम ठराविक ठिकाणी होत असते काहीवेळा तर चक्क पावसाळ्यात ही न्हाई चे अधिकारी उभे राहुन माती मिश्रीत वाळू व मुरूमच्या सहाय्याने मार्गाला ठिगळ लावण्याचे काम करतांना दिसले. याबाबत स्थानिक प्रतिनिंधीनी ही काहीसा आवाज उठवला त्याचा काही फायदा या अधिकारींवर झाला नाही.
दरम्यान, सध्या यावल शहराच्या नजीक गॅस एजन्सी पासुन रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. पण हे काम करत असताना खड्डे बुजवणारे हे जणू काही खो-खो खेळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यात १० खड्डे बुजले तर २० खड्डे सोडले जात आहे खड्ड्यांमधली आधीची माती माती बाहेर न काढता बारीक खडी व डांबर सुद्धा कमी प्रमाणात वापरत आहे.
या महामार्गाची दुरूस्ती चांगल्या प्रकारे करण्यात यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी केली आहे. ते स्वत: या रस्त्याने जात असताना नागरिकांनी व त्यांनी रस्त्यावर थांबून ठेकेदाराला चांगले काम करा असा सज्जड इशारा दिला नाही तर आम्ही याच्यासाठी आंदोलन करू असा इशारा दिला आहे.