पंढरपूर वारीतून यावल आगाराला मिळाले २२ लाख १३ हजारांचे उत्पन्न

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंढरपुरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक महाराष्ट्र राज्यातील वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव यंदा आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाच्या पालखी दर्शनाला यात्रेसाठी जाणाऱ्या तालुक्यातील वारकरी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना माहीती दिली आहे.

यावलचे एसटी आगार गेल्या अनेक दिवसांपासुन विविध अडचणी व समस्यांनी ग्रासले असतांना यंदाच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने यावलच्या एस टी आगारातुन विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकरींच्या सेवेसाठी एकुण ७२ फेऱ्या धावल्या. यात बसेस एसटी ३८ हजार ५३६ किलो मिटरचा प्रवास करीत २२ लाख १३ हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. यात यावल आगाराला ८ लाख ५९ हजार २७१ रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी यंदा पंढरपूर यात्रेसाठी पंढरीच्या विठूमाऊलीला दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी भाविकांनी एसटी बस गाडयांमध्ये सुरक्षीत प्रवास करीत मोठा प्रतिसाद दिल्याबाबत भक्तांचे त्यांनी विशेष आभार मानले आहे.

Protected Content