श्रीनगर वृत्तसंस्था । फुटिरतावादी नेता तथा जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलीक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर, केंद्र सरकारने अलीकडेच यासीन मलीकसह अन्य फुटिरतावादी काश्मिरी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. यामुळे या नेत्यांच्या गोटात घबराट पसरली आहे. यामुळे त्यांनी आम्हाला सुरक्षा नकोच हवी होती अशा उलट्या बोंबा ठोकल्या आहेत. यातच आता यासीन मलीकला काल रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. यासिन मलीक याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कलम ३५-अ बाबत महत्वाची चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमिवर मलिकला अटक करण्यात आल्याचे मानले जात आहे.