जळगाव (प्रतिनिधी) उन्हाळात खरबूज व कैरी ही फळे सहज उपलब्ध होत असतात, म्हणून यापासून एक सरबत तयार केले तर ते कसे लागेल ? याचाच विचार करत शेफ हर्षाली चौधरी यांनी ‘खरबुजा-कैरी सरबत’ तयार केले आहे. गमंत म्हणजे ते अतिशय उत्तम आणि चविष्ट बनले, त्यांनी जेव्हा हे खरबुजा कैरी सरबत घरातील मंडळीना दिले, तेव्हा सगळयांनाच ते मनापासून आवडले.
चवीला बरेचसे फिके लागणारे खरबूज सहसा नुसते खाताना अनेकजण नाक मुरडत असतात. अशा खरबुजामध्ये जेव्हा कैरीच्या आंबट व चटपटीत चवीचा मिलाफ होतो, तेव्हा हे साधे-भादे खरबूजही भाव खावून जाते. सर्वांनी या फ्युजनचे दिलखुलास कौतुक केले. त्यांनीच याला नाव दिले “खरबूजा- कैरी सरबत”…हे सरबत बनवण्याचे साहित्य असे आहे । कच्ची कैरी, खरबूज, काळमीठ, जिरपुड, शुगर सिरप आणि बर्फाचे तुकडे. अशाच प्रकारच्या अन्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ‘लाइव्ह ट्रेंडस् न्यूज’ला नियमित भेट देत राहा.