जळगाव प्रतिनिधी । शहरात राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलाचे काम पुर्णत्वास येत आहे. या पुलाला ग्रामदैवत झिपरू अण्णा महाराज उड्डाण पुल असे नाव देण्याची मागणी झिअम फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदिप साळी यांनी राष्ट्रीय महामार्ग नही यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रदीप साळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नशिराबादचे ग्रामदैवत नशिराबाद कराचे श्रध्दा व जाग्रुत देवस्थान असुन मुंबई व पुणे, विदर्भ, गुजरात व इतर राज्य त्यासह परदेशातील भाविक या ठिकाणी महाराजांच्या दर्शनाला येतात. या पावन भुमित महाराजांनी चमत्कार केले आहे. राष्ट्रीय महामार्गावर तयार होणाऱ्या उड्डाण पुलाला ग्रामदैवत झिपरू अण्णा महाराज यांचे नाव दिल्याने गावात चैतन्य निर्माण होईल आणि नागरीकांना आनंद होईल, तरी आपण या निवेदनाचा विचार करून उड्डाण पुलाच्या नामकरणाचा विचार करून लवकरा लवकर नामकरण करावे अशी मागणी राष्ट्रीय महामार्गाचे संचालक सिन्हा यांना निवेदन देवून केली आहे. यावेळी झिअम फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप साळी, सदस्य दिपक जावरे, आकाश देवळे आदी उपस्थित होते.