Home Cities जळगाव जळगावचा राजा नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे उद्या भारतमाता पूजन

जळगावचा राजा नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे उद्या भारतमाता पूजन

0
25


जळगाव, प्रतिनिधी | येथील जळगावचा राजा नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त मंगळवारी सकाळी १० वाजता भारतमाता पूजन, ध्वज पूजन आणि श्रीराम पूजन केले जाणार आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीखाली मुख्य रस्त्यावर हा कार्यक्रम होणार आहे. विजयादशमीच्या पावन दिवशी परिसरात भव्य रांगोळी काढून वातावरण निर्मिती केली जाणार आहे. सकाळी आ.सुरेश भोळे, बजरंग दलाचे ललित चौधरी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिन नारळे, माजी नगरसेवक किशोर भोसले, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, ओंकारेश्वर देवस्थानचे दीपक जोशी, नेहरू चौक बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी रेड्क्रोस सोसायटीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound