यावल महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणावर योग शिक्षिका सुरेखा अशोक काटकर यांनी शिक्षकांना योगाचे महत्त्व या विषया संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शारीरिक मानसिक आरोग्य भावनिक स्थैर्य श्वासोस्वास या विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले. तसेच त्यांनी योग कार्यक्रमास उपस्थितांकड्डन त्यांनी वेगवेगळ्या आसनांची प्रात्यक्षिके करून घेतली. या कार्यक्रमाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.एस पी कापडे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा.सी.के. पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. वरिष्ठ कनिष्ठ व किमान कौशल्य विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा.संजय पाटील, प्रा.मुकेश येवले, प्रा.मनोज पाटील, डॉ.हेमंत भंगाळे, मिलिंद बोरघडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

Protected Content