जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील आदिवासी जागतिक दिन तसेच क्रांतीदिनानिमित्त आदिवासी एकता मंच शाखेच्यावतीने आदिवासी जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे आदिवासी नृत्य सादर करून सवाद्य मिरवणूक काढून आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सागर गरुड हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी कृषी सभापती जिल्हा परिषद जळगाव प्रदीप लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, शिवसेना प्रवक्ता जामनेर तालुका गणेश पांढरे, रेल्वे सेंटर बोर्डाचे सदस्य रामेश्वर पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शैलेश पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉक्टर सागर गरुड, प्रदीप लोढा, राजधर पांढरे, रामेश्वर पाटील, चेतन रोकडे, फिरोज तडवी आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रामेश्वर पाटील यांनी केले तर आभार गोंदेगाव येथील राजू तडवी मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, ग्रामपंचायत सदस्य गयास तडवी, ईश्वर बारी, तोफिक तडवी, रवी मोरे, विश्वनाथ वानखडे ,किरण पाटील, अबू तडवी, कमृद्दिन तडवी, आदिवासी एकता मंच प्रदेशाध्यक्ष कदीर तडवी, जिल्हा उपाध्यक्ष शेख चांद तडवी, सरफराज तडवी, तालुका अध्यक्ष सांडू तडवी, रहीम तडवी, अजहर तडवी, नसीर तडवी ,केशव भिल, बाबु तडवी, रमजान तडवी ,सुनील भिल ,श्रावण भिल ,अखिल तडवी यांच्यासह शहरातील व परिसरातील आदिवासी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.