यावल येथील महाविद्यालयात जागतिक अवयवदान दिन साजरा

यावल प्रतिनिधी । शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभागच्या वतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. एस. पी .कापडे यांनी जागतिक अवयवदान दिन साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ हेमंत बऱ्हाटे यांनी ‘अवयवदान आणि जीवनदान’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, अवयवदान दोन प्रकारे करता येते. जिवंतपनी रक्त, त्वचा, यकृत व मृत्युपश्चात डोळे, किडनी, रुदय दान करता येते. अवयवदानाने मृत्यूनंतरही माणसाला जीवन जगता येते म्हणून अवयव दान हे जीवनदान आहे .प्रत्येकाने मातीमोल शरीराला मोतीमल करावे.

 प्राचार्य  डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीमुळे अवयव दान हे एक वरदान ठरलेले आहे. जिवंतपनी  देहदानाची प्रक्रिया आपण करू शकतो. त्यामुळे अवयव दान हे राष्ट्रीय कार्य प्रत्येकानी हाती घ्यावे. अवयवदान या विषयावर ऑनलाइन रांगोळी व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेत अनुक्रमे प्रथम याज्ञिका किशोर जावळे, (एसवायबीएससी) द्वितीय कोमल जितेंद्र पाटील (एसवायबीएससी) तृतीय मोहिनी फेगडे (एफवायबीए)यांनी यश प्राप्त केले .घोषवाक्य स्पर्धेत समृद्धी विकास फेगडे (एफ वाय बी कॉम ),समाधान जगदीश धीवर (एस वाय बी ए ) याज्ञिका किशोर जावळे (एस वाय बी एस सी )हे स्पर्धक यशाचे मानकरी ठरले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा .आर.डी. पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा.एम.डी .खैरनार प्रा.अर्जुन पाटील, डॉ. पी. व्ही. पावरा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Protected Content