चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि तालुका वकील संघ चाळीसगाव तसेच अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज शिबीर आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबीरात भिल्ल वस्ती, करगांव रोड चाळीसगाव येथे एन.के.वाळके, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर चाळीसगाव यांचे अध्यक्षतेखाली शिबीरात एकलव्य प्रतिमाचे पूजन करुन सुरुवात झाली.
सदर कार्यक्रमात अॅड. माधुरी बी. एडके, सचिव, तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी शाळा सोडलेल्या मुलांना परत आणणे करिता मार्गदर्शन व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. अॅड. राहुल वाकलकर, सदस्य, तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘बालविवाह बंदी कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड. प्रियंका पवार, सदस्य, तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘पी.सी.आणि पी.एन.डी.टी. कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड. लव हरीभाऊ राठोड, सदस्य, तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९’ या विषयावर मार्गदर्शन केले. एन. के. वाळके, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर चाळीसगाव यांनी ‘जागतिक आरोग्य दिन’ व अध्यक्षीय भाषण केले. सदर कार्यक्रमास आत्माराम मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. अॅड. दुर्गेश सुर्यंवंशी, सदस्य, यांनी उपस्थितांचे आभार मानले.
त्यानंतर अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव येथे एन. के. वाळके, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर चाळीसगाव यांचे अध्यक्षतेखाली शिबीरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर अध्यक्षांच्या हस्ते ‘सामाजिक समता’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सदर शिबीरात अॅड. माधुरी बी. एडके, सचिव, तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी शाळा सोडलेल्या मुलांना परत आणणे करिता मार्गदर्शन व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. अॅड. लव हरीभाऊ राठोड, सदस्य, तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९’ या विषयावर मार्गदर्शन केले. एन. के. वाळके, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर चाळीसगाव यांनी ‘जागतिक आरोग्य दिन’ व अध्यक्षीय भाषण केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सदर कार्यक्रमास अॅड. बी.के.पाटील,अध्यक्ष तालुका वकील संघ चाळीसगाव, अॅड.वर्षा एकनाथ देवरे खजिनदार, तालुका वकील संघ चाळीसगाव, निवासी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे, उपक्रमशिल शिक्षक ध्रुवास राठोड, सहा. शिक्षक ज्ञानेश्वर लिंगायत, सहा. शिक्षीका सोनाली महाजन, रुपाली सोनवणे, शिपाई अनिता तोंडे, संभाजी पाटील हे उपस्थित होते. सहा.शिक्षक डी. बी. परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर शिबीर यशस्वी करण्याकरिता डी.के. पवार, डी.टी. कु-हाडे, के.डी.पाटील यांनी काम पाहिले.