जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान संस्थेत १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अन्नतंत्रज्ञान संशोधन संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दयाल कुमार आहुजा, केसीआयआयएलचे मुख्यकार्यकारी अधिकारी सागर पाटील, संस्थेचे माजी संचालक प्रा.जितेंद्र नाईक व अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पराते , व प्लास्टिक तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ जितेंद्र नारखेडे यांच्या उपस्थितीत पार पडले. यानंतर वाद विवाद स्पर्धा,पोस्टर व पाककृती स्पर्धा पार पडल्या. यात एकूण ३६ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात जळगाव व परिसरातील अन्न उत्पादन करणाऱ्या विविध उदयोजकांसमवेत औद्योगिक शैक्षणिक संवाद या निमित्ताने पार पडला. यात एकूण ९ उदयोजक उपस्थित होते. दुपार नंतर डॉ. दयाल कुमार आहुजा यांनी अन्न सुरक्षा व अन्न तंत्रज्ञानातील योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर समारोप समारंभाला विद्यापीठातील वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. भूषण चौधरी, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. ए. के. गोस्वामी व अन्नतंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ.विशाल पराते उपस्थित होते. यावेळी पोस्टर, वादविवाद प्रदर्शन स्पर्धेत:- पुलत्स्या महाजन, भूमी सोनवणे; रेसिपी स्पर्धेत:- रिया सपकाळे, अभिमन्यू साळुंके, यश माळी; वादविवाद स्पर्धेत:- लक्ष्मी कोहाड. विजेते ठरले.