जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत गोदावरी नर्सिंग महाविद्यालय जळगावमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह पाळला यात ७ दिवस विविध उपक्रम राबवण्यात येवून जनजागृती करण्यात आली. १ ऑगस्ट रोजी सप्ताहाचे निवासी वैद्यकिय अधिकारी स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ.रश्मी सांगवी यांचे हस्ते लोगो आणि थीमचे रीबन कापून उदघाटन करण्यात आले.
३ ऑगस्ट रोजी स्त्रीरोग वार्ड मधे जावून गर्भवती महिला व रूग्णांना स्तनपानाचे महत्व नाटीकेतून समजावून सांगीतले. ५ ऑगस्ट रोजी गर्भवती महिला,रूग्ण व नातेवाईक महिलाना आरोग्य प्रशिक्षण देण्यात आले. ६ ऑगस्ट रोजी गोदावरी नर्सिंग सेमीनार हॉल मध्ये स्तनपान विषयक पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यात १० विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला.दुपारच्या सत्रात स्त्रीरोग तज्ञांच्या संघटनेमार्फत डॉ. शितल भोसले,डॉ भावना चौधरी यांनी स्तनपानाच्या पध्दतीवर मार्गदर्शन केले.
७ ऑगस्ट रोजी निवासी वैद्यकिय अधिकारी स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ.रश्मी सांगवी यांनी मार्गदर्शन करतांना नवजात शिशूसाठी मातेचे दुध अमृततुल्य असते, कुठलाही गैरसमज न बाळगता मातेने शिशुंना योग्य पध्दतीने स्तनपान करावे पुढे बोलतांना त्यांनी स्तनपान विविध पध्दती,कालावधी, याबाबत माहिती दिली यावेळी पोस्टर आणि रोल प्ले विजेत्यांना डॉ रश्मी सांगवी, प्रा मिनाव खुरेजा,प्रा जयश्री जाधव यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभाग प्रमुख प्रा मिनावदेवी, प्रा जयश्री जाधव,प्रा सुवर्णा पाटील, प्रा प्राजक्ता सावरकर आणि कॉलेट लोंढे यांनी परिश्रम घेतले.