Home आरोग्य धरणगावातील ग्रामीण रूग्णालयात जागतिक एड्स दिन साजरा

धरणगावातील ग्रामीण रूग्णालयात जागतिक एड्स दिन साजरा


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक एड्स दिना निमित्त आय.सी.टी.सी. विभाग ग्रामीण रुग्णालय धरणगाव, साने गुरुजी फाउंडेशन संस्था, अमळनेर व तालुका होमगार्ड पथक कार्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी दि. १ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर पाटील यांनी केले.जागतिक एड्स दिना विषेश महत्व, एचआयव्ही म्हणजे काय? एचआयव्ही व एड्स यातील फरक, एचआयव्ही होण्याची प्रमुख कारने कोणती? विशेष घाव्याची काळजी, समाजातील गैरसमज,उपचार व एचआयव्ही बाधित व्यक्तींना योग्य समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणे या सर्व मुद्यांवर ग्रामीण रुग्णालय धरणगाव समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी यांनी माहिती मार्गदर्शन केले तसेच राजेश्वर काकडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी एच आय व्ही संबंधित विविध तपासण्या बाबत माहिती दिली.

सदर कार्यक्रमाला उपस्थित तालुका होमगार्ड पथक पटल प्रमुख ईश्वर सखाराम महाजन, लिपिक ईश्वर पाटील, शिपाई जानकीराम पाटिल, स्थलांतरित कामगार कल्याण कार्यक्रम प्रतिनिधी समुपदेशक अमोल सूर्यवंशी, महिला होमगार्ड पथक प्रतिनिधी लता वाणी मॅडम, साने गुरुजी फाउंडेशन संस्थेच्या लिंक वर्कर अश्विनी शिंपी, भिकन लोहार, सुदर्शन पाटिल,अरुण सातपुते,आत्माराम चौधरी व इतर सर्व होमगार्ड पथक कर्मचारी उपस्थीत होते.


Protected Content

Play sound