जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल विवाह मुक्त भारत’ या विषयावर कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव व आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने २७ नोव्हेंबर२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता ‘बाल विवाह मुक्त भारत’ या विषयावर जळगाव येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय, मेहरूण आणि राज प्राथमिक विद्या मंदीर मेहरूणयेथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमास एस. पी. सय्यद, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश व. स्तर, हे उपस्थित होते. तसेच आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती पाटील, कार्याध्यक्षा श्रीमती रेणु प्रसाद व सहकारी उपस्थित होते.

सचिव यांनी विद्यार्थ्यांना बाल विवाह या विषयावर मार्गदर्शन केले तसेच बाल विवाह करणार नाही आणि बाल विवाह होण्यास प्रतिबंध करण्याबाबत शपथ दिली. तसेच आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यांनी बालकांना बाल विवाह बावत मार्गदर्शन केले. हे शिबीर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्री बी. के. मोरे, प्र. अधिक्षक, श्री प्रमोद ठाकरे, कनिष्ठ लिपीक, श्री जावेद पटेल, शिपाई तसेच आधार बहुउद्देशीय संस्थेचे सहकारी यांच्या सहकार्याने पार पडले.

Protected Content