भुसावळ प्रतिनिधी । प्रधानमंत्री आवास योजनेतून भुसावळात ३५० घरकुले मंजूर करण्यात आली असून याबाबत आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना नगरपालिकेच्या माध्यमातून राबविली जात असून भुसावळ शहरातील लाभार्थ्यांचे घरकुलाचे अर्ज नगरपालिकेकडे जमा करण्यात आले होते.त्यातील ३५० घरकुलांना राज्य व केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. सर्व प्रथम शहीद झालेल्या जवानाला श्रद्धांजली अर्पित करून कार्यशाळेला सुरू करण्यात आली. शहरातील प्रथम टप्पाला ३५० घरकुलांच्या राज्य शासन व केंद्र शासनाने मंजुरी दिली असून लोणारी मंगल कार्यालयामध्ये घटक क्रमांक ४ अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सर्वांसाठी घरे ह्या योजनेत ज्यांना घर नाही अशा आर्थिक दुर्बल घटकांना झोपडपट्टीवासी व अल्प उपन्न असणार्या लाभधारकांना सहभागी होता येईल.ह्या योजने अंतर्गत लाभधारकास बांधकामासाठी अनुदान केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे. या योजनेत ३ लाखापर्यत उपन्न असणार्या आर्थिक दुर्बल घटकास ३०:०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या घर बांधता येईल.अशी माहिती कार्यशाळेत देण्यात आली.
याप्रसंगी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर म्हणाले की, या योजनेत चार टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार शेवटचा टप्पा तीस हजाराचा राहणार असून केंद्र शासन नगरपालिकेच्या माध्यमातून लाभार्थीच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे पण त्या लाभार्थीचे घरकुल पूर्ण बांधकाम झाल्यानंतर तो पैसे वर्ग करण्यात येणार आहे.
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, लाभार्थ्यांना काही अडचणी आल्यास नगरपालिका सोमवार पासून दोन आवास योजनेचे टेबल लावणार आहे.घरकुल संबंधी कोणालाही काही अडचणी आल्यास आपल्याला त्या ठिकाणी माहिती उपलब्ध होबर आहे.तसेच ज्या लाभार्थीचे घरकुल मंजूर झाले आहे त्यांना लवकरच आपल्या घराचा प्लॅन तयार करून नगरपालिकेच्या इंजिनिअर कडे जमा करायचा आहे .तीन ते चार दिवसात घरकुल बांधण्याची मंजुरी दिली जाण्याची माहिती दिली.हे सर्व शक्य झाले ते आमचे नेते एकनाथराव खडसे तसेच खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात भुसावळ शहरातील जनतेला डीपीआर मंजूर झाल्याचे ते म्हणाले.
या कार्यशाळेला खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, प्रा.डॉ.सुनील नेवे, नगरसेविका सविता मकासरे, नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक राजेंद्र नाटकर,अमोल इंगळे, महेंद्रसिंग ठाकूर यांची उपस्थिती होती.