राजदेहरे येथे नाला खोलीकरणास प्रारंभ

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील राजदेहरे येथे आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने नाम फौंडेशनच्या सहकार्याने नदी – नाला खोलीकरण आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित नूतन तहसीलदार अमोल मोरे साहेब, तालुका कृषी अधिकारी साठे साहेब, नाम फौंडेशन चे संदीप काकडे, पं. स. सदस्य भाऊसाहेब पाटील, नरेंद्र जैन, राजदेहरे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामांसाठी आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या विनंतीवरून नाम फाऊंडेशन ने उच्च क्षमतेचे पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले असून यामुळे राजदेहरे गावाचा संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे.

Add Comment

Protected Content