चाळीसगाव (प्रतिनिधी)।। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील जळगाव जनता बैंकेतर्फे महिलांसाठी मेळावा आयोजित केला गेला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष जळगाव जनता बँकच्या सल्लागार डॉ. सुनिता घाटे या तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक अॅड. आशा गोरे शिरसाठ या होत्या. यावेळी जळगाव जनता बैंकेचे मॅनेजर आंनदा पाटील व बँकेचे सल्लागार तथा विहिंपचे बाळासाहेब नागरे हेही उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचा सत्कार विविध बचत गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ,साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी आधार कायदेविषयक सहायता केंद्राच्या अध्यक्ष व संभाजी सेना विधी सल्लागार अॅड.आशा गोरे शिरसाठ यांनी समस्त महिला वर्गाशी सुसंवाद साधला.कुंटुंबाची अर्धीअधिक आर्थिक जबाबदारी ही महिला तिच्या शिस्त व सचोटिने सांभाळून घेत असते. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत,नोकरी वा उद्योग व्यवसाय देखील उत्तम रित्या सांभाळून आपल्या स्मार्ट जीवनशैलीचा ती परिचय करून देते. अशा परिस्थितित देखील सामाजिक व्यवस्थेशी तीव्र अशा संघंर्षाला तिला सामोरे जावे लागते. आजही स्त्रीला कुटुंबात व सामाजिक जीवनात मानसिक, शारिरीक अत्याचारास,लैंगिक छळास, आर्थिक अन्यायास,राजकीय दुय्यमत्वास सामोरे जावे लागते.अशा स्थितीचाही स्त्री खंबीरपणे मुकाबला करत अढळस्थान निश्चित करत आली आहे.असे प्रतिपादन अॅड.आशा शिरसाठ यांनी केले.यावेळी त्यांनी महिलांसाठीचे शैक्षणिक कायदे, कौटुंबिक, मालमत्तेविषयी कायदे इ.संदर्भात महत्वपूर्ण उपयुक्त अशी माहिती उपस्थित महिलांना करून दिली आणि पिडीत व निराधार महिलां करिता आधार कायदेविषयक सहायता केंद्रामार्फत मदत पुरवली जात असल्याबाबतची माहिती दिली.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सहभाग
स्वस्थ शरीर स्वस्थ मानसिकता घडवते आणि त्यातूनच कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ अबाधित राखता येते. म्हणून महिलांनी आपल्या आरोग्याप्रती सजग राहून स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य राखावे असे आवाहन डॉ.सुनिता घाटे यांनी उपस्थित महिलांना केले. बैक मैनैजर श्री.आनंदा पाटील यांनीदेखील मार्गदर्शक करून महिलांनी आर्थिक दृष्टया निर्भर व्हावे असे मनोगत व्यक्त करून, बैंकेच्या आर्थिक उलाढालीचा आढावा घेतला. यावेळी काही महिलांनीही आपल्या शंका विचारून मनोगत माडंले.समन्वयक श्रीमती वंदना बागूल यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती वेलीस यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सौ.वेलीस, सौ.सूचिता गायकवाड़, सारीका, सरला येवले, शोभा देशमुख, रंजना चौधरी, साधना शिरसाठ आदी महिलांसोबत जाणीव, नक्षत्र, कर्तव्य, आशा विविध बचत गटातील महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या.
महिला पदाधिकाऱ्यांची निवड
यानंतर मेळाव्यात महीला आघाडीच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यात भडगाव उपशहरप्रमुखपदी कमलताई अहीरे, सुशिलाताई पाटील, रजंनाताई पाटील व पाचोरा उपशहरप्रमुखपदी मालती पाटील व प्रियंका पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रंसचालन मनोहर चौधरी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे.के. पाटील, लखीचंद पाटील, रविंद्र पाटील, दिलीप राजपूत, माधव राजपूत, नरेद्र सुर्यवंशी आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.