इकरा थीम महाविद्यालयात महिला दिन उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इकरा थीम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.चांद खान व उपप्राचार्य डॉ.शेख वकार हे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. तन्वीर खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.शेख हाफिज यांनी केले.या कार्यक्रमामध्ये महिला प्राध्यापिका डॉ.शबाना खाटीक आणि डॉ. कहकशा अंजुम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी डॉ.इरफान शेख, डॉ.आमीन काझी,डॉ.राजु गवरे, प्रा.काझी मुझ्झमिल हे उपस्थित होते.महाविद्यालयाचे विद्यार्थीनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा . काझी मुझ्झमील यांनी आभार मानले.

 

Protected Content