जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सोमवारी १६ मे रोजी जळगाव जिल्हा दौरा असून जळगाव शहरातील एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा सोमवार १६ मे रोजी जळगाव जिल्हा दौरा आहे. सोमवारी १६ मे रोजी दुपारी १२ वाजता चाकणकर ह्या नाशिक येथून वाहनाने जळगावकडे रवाना होणार असून सायंकाळी सहा वाजता जळगाव येथे आगमन होणार आहे. शहरातील आकाशवाणी चौकातील लाडवंजारी सभागृहात सायंकाळी ६ वाजता महिला व आरोग्यकर्मी सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यानंतर सोईनुसार अजिंठा येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी राहणार असून मंगळवारी १७ मे रोजी सकाळी ८ वाजता अजिंठा विश्रामगृह येथून पुण्याकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.