महिला बचत गटांच्या स्वयंरोजगारासाठी भुसावळात मेळावा

rojgar

भुसावळ प्रतिनिधी । महिला बचत गटांना घरबसल्या स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांना अर्थाजनाचा नवीन मार्ग प्रदान करण्यासाठी शहरात दिनांक ७ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरासह ग्रामीण भागात महिला बचत गट मोठ्या प्रमाणात स्थापन करण्यात आले आहेत. तथापि, योग्य मार्गदर्शनाच्या अभावी बहुतेक गटांना अर्थाजनाचे कोणतेही साधन उपलब्ध झालेले नाही. या पार्श्‍वभूमिवर, बचत गटाच्या महिलांना सोशल मीडियात आणि प्रत्यक्षातील जनसंपर्काच्या माध्यमातून स्वयंरोजगार देण्यासाठी रविवार दिनांक ७ जुलै रोजी सायंकाळी तेली समाज मंगल कार्यालय, सब्जी मंडी, भुसावळ येथे ४ ते ६ या वेळेत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे राहणार आहेत. याप्रसंगी डॉ. निलेश महाजन आणि जळगाव जनता सहकारी बँकेचे अधिकारी हे उपस्थित महिलांना स्वयंरोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी ९३७३३०८३६० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. या कार्यक्रमाचे आयोजन अथर्व हर्बलचे संचालक डॉ. निलेश महाजन हे आहेत.

Protected Content