यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावल एस.टी. बस आगारात महिलांचा सन्मान करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. लालपरीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या महिला प्रवासी तसेच आगारातील महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावल एस.टी. आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आगाराच्या वाहतूक नियंत्रक मीना तडवी यांच्या हस्ते बसस्थानक आवारातील प्रवासी महिलांना गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्याने झाली.
या कार्यक्रमात वाहक प्रिया डांबरे, शारदा आस्वले, सलमा तडवी, समता महाजन, प्रियंका धनगर, माया बिर्हाडे, आर. ए. तडवी तसेच वरिष्ठ लिपिक महेंद्र पाटील, लिपिक अतुल चौधरी, वाहक सुकलाल सूर्यवंशी, हेमंत पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी महिलांनी विविध क्षेत्रात यशाची शिखरे गाठली असून, त्यांच्या कर्तृत्वामुळे समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गार काढले. महिला सशक्तीकरणाचा संदेश देत, त्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.