जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कॉंग्रेस भवनाबाहेर आज महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी चक्क भिक मांगो आंदोलन केले. यावेळी सबंधित महिलेने कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत हे आंदोलन त्यांना पैसे देण्यासाठी करत असल्याचे सांगितले. दरम्यान, या आंदोलनामुळे कॉंग्रेसच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहरध्यक्षा अरुणा पाटील यांनी आज दुपारी कॉंग्रेस भवनाबाहेर अचानक भिक मांगो आंदोलन सुरु केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कॉंग्रेस भवनाबाहेर आधी काही दुकाने होती. कालांतराने ही दुकाने पाडल्यानंतर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांनी कॉंग्रेस भवनाचा चहा-पाणीचा खर्च निघावा म्हणून काही विक्रेत्यांना कॉंग्रेस भवनात दुकाने दिली. भविष्यात संदीपभैय्या हे कॉंग्रेस भवन देखील भाड्याने देण्यास कमी करणार नाहीत. यासर्व गोष्टींच्या निषेधार्थ आपण आंदोलन करत असल्याचे अरुणा पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, कॉंग्रेस भवनातील दुकानाविषयी काही तक्रार होती तर, प्रदेश अध्यक्ष किंवा जिल्हा प्रभारी यांच्याकडे देणे गरजेचे होते. अशा आंदोलनाने पक्षाची बदनामी झालीय. आम्ही प्रदेशला अहवाल पाठविला आहे.
पहा : काँग्रेस महिला शहराध्यक्षांचे भीक मांगो आंदोलन !