पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Womane

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील माहेर आणि न्याहळोद ता.धुळे सासर असलेल्या 26 वर्षीय विवाहितेला पाच लाखांसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी वारंवार मारहाण व मानसिक छळ प्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल आला.

याबाबत माहिती अशी की, संगिता विठ्ठल लोहार वय-26 रा. आशाबाबा नगर यांचे वेल्डींग कारागीर विठ्ठल रामलाल लोहार रा. न्याहळोद ता.धुळे यांच्यासोबत 2 जून 2012 रोजी लग्न झाले. त्यांना दोन अपत्य आहे. लग्नाच्या सुरूवातीचे 8 आठ दिवस सुखात गेले. त्यानंतर पतीने माहेरहून वेल्डींग दुकानासाठी 5 लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला वारंवार मारहाण करत होता तर सासरे, सासू, जेठ, जेठाणी, ननंद यांच्याकडून सतत मानसिक छळ आणि शिवीगाळ करत होते. वडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने विवाहितेने पाच लाख रूपये देऊ शकत नसल्याने सासरच्या मंडळींनी तिला घरातून हाकलून दिले. सर्वांच्या त्रास सहन न झाल्याने त्या माहेरी मुलांसह निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती विठ्ठल रामलाल लोहार, सासु मीराबाई रामलाल लोहार, सासरे रामलाल हिरालाल लोहार, जेठ सुरेश रामलाल लोहार, मल्हार रामलाल लोहार, जेठाणी स्वाती मल्हार लोहार, ननंद सुरेखा सदाशीव लोहार यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content