धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथे माहेरी असलेल्या विवाहितेची बसस्थानक आवारातून सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स चोरी केल्याची घटना शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञत चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर येथील राहणाऱ्या वैशाली नंदलाल चौधरी (वय-३० आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपासून मुलीच्या जावूक काढण्याच्या कार्यक्रमासाठी धरणगाव येथे आपल्या आई-वडिलांकडे आल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्या आपल्या आई आणि मुलांसोबत शिरपूरला जाण्यासाठी धरणगाव बसस्थानकावर पोहोचल्या. त्यांच्या पर्समध्ये ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल आणि ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र एका डबीत ठेवले होते. तसेच, त्यांच्या कपड्याच्या बॅगेत ३०० रुपये रोख ठेवले होते.
दुपारी 4 वाजता जळगाव-शहादा बस आली. बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची खूप गर्दी होती. त्यामुळे त्या बसमध्ये चढल्या नाहीत. बस निघून गेल्यावर त्यांनी आपली पर्स पाहिली असता, तिची चैन उघडी होती. त्यांनी पर्स उघडून पाहिली, तर त्यातील दागिन्यांची डबी गायब होती. तसेच, बॅगेतील ३०० रुपयेही चोरीला गेले होते. वैशाली यांनी बसस्थानकावर आणि आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली, पण काहीही मिळाले नाही. अखेर त्यांनी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.