अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानक बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील २४ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी १७ जुलै रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा राजेश वाघ वय ३९ रा. उदयनगर ता.अमळनेर ह्या महिला आपल्या मुलासोबत गुरूवारी १७ जुलै रोजी कामानिमित्त आलेल्या होत्या. त्यांचे काम आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास त्या बसस्थानकात आलेल्या होत्या. त्यांच्या मुलासोबत बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र तोडून चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बसमध्ये आणि बसस्थानक आवारात चोरट्याचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संतोष पवार हे करीत आहे.




