जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अंगणवाडी सेविकेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व पर्स मधील १ हजार रुपये असा एकूण ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की. विजया विजय हिवराळे वय ४२, रा. धामणगाव ता.जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला असून अंगणवाडीसेविका म्हणून ते आपल्या उदरनिर्वाह करत असतात. शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता त्या नवीन बसस्थानकातील आवारात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि पर्स मधील १ हजार रुपये असा एकूण ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना चव्हाण करीत आहे.