जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे मंगळवारी १८ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनिला राजरत्न भोगे वय ४२ रा. अशोक नगर, जामनेर या महिला कामाच्या निमित्ताने मंगळवारी १८ जून रोजी जळगाव शहरात आलेल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजता त्या जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात आलेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातीन २० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यानंतर महिलेने मंगळसुत्रांचा शोध घेतला पंरतू त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख ह्या करीत आहे.