Home क्राईम मदत करण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल

मदत करण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सिलबर्डी शिवारात बकऱ्या चारणाऱ्या महिलेचा एकांताचा फायदा घेवून पंप उचलण्याचे बहाणाने आवाज देवून अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी २ रोजी घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी २० वर्षीय महिला ही शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सिलबर्डी शिवारातील शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी हरी गोरख बारी रा. शिरसोली ता. जळगाव याने तिचा एकांताचा फायदा घेवून महिलेला शेतात फवारणी पंप उचलण्यासाठी मदतीचा बहाणा करून बोलावले. त्यावेळी महिला ही मदतीसाठी गेली असता संशयित आरोपी हरी बारी याने महिलेसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेला जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पिडीत महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी हरी बारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound