जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जी.एस. मैदानासमोरून पायी जाणाऱ्या महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील जी.एस.मैदान समोरून रिना अरूण चौधरी वय ४० रा. जुना खेडी रोड, जळगाव या महिला २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घराकडे पायी जात होत्या. त्यावेळी समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीडी ४४३८) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेबाबत गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहे.



