जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या श्री संतुलन हॉस्पिटलच्या वार्डबॉयकडून उपचारासाठी बाहेरगावाहून आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका गावातील २६ वर्षीय महिलेवर जळगाव शहरातील श्री संतुलन हॉस्पिटल येथे उपचारा सुरू आहे. मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतांना वार्डबॉय निलेश ज्ञानेश्व बाविस्कर रा. कांचन नगर, जळगाव याने जाणूबुजून उपचार घेण्याची काहीही आवश्यकता नसतांना महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी वार्डबॉय निलेश बाविस्कर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना राठोड करीत आहे.