मध्यरात्री महिलेचा विनयभंग तर तिच्या पतीला जीवेठार मारण्याची धमकी

0
153

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातील एका भागात राहणारी महिला ह्या कुटुंबासह गच्चीवर झोपलेली असतांना गावात राहणाऱ्या एकाने रविवारी २१ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता अश्लिल वर्तन करत विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला व महिलेला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडली. याबाबत सकाळी ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील  एका गावातील एका भागात २४ वर्षीय महिला ही आपल्या पती व कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. रविवारी २१ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास महिला ही पती व कुटुंबासह घराच्या गच्चीवर झोपलेली असतांना संशयित आरोपी महेंद्र पांडूरंग मराठे हा गच्चीवर येवून महिलेशी अश्लिल वर्तन केले. हा प्रकार घडताच महिलेने तिच्या पतीला उठविले. त्यावेळी संशयित आरोपी महेंद्र मराठे याने महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ धनराज साळुंखे हे करीत आहे.