पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील पुजारी नगर परिसरात एका २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी २८ जानेवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही पाचोरा तालुक्यातील एका गावातील रहिवाशी आहे. कामाच्या निमित्ताने बुधवारी २८ जानेवारी रोजी त्या पाचोरा शहरात आलेल्या होत्या. दरम्यान दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास पुजारी नगरमधील एका रिकाम्या प्लॉटजवळून जात असताना, संशयित आरोपी निलेश कुमावत तिथे दुचाकीवर आला. त्याने महिलेचा उजवा हात धरला आणि बळजबरीने मोटार सायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने पाचोरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोहेकॉ गजानन देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहे.




