पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्वारगेट एसटी स्थानक येथे सातारा बस स्टॉप समोरील एसटीतून उतरुन पायी जात असलेल्या महिलेस एका एसटी चालकाने धडक देऊन महिला जमीनीवर पडल्यावर, तिच्या डाव्या पायाच्या घोटेयावरुन एसटीचे पुढील चाक जाऊन महिलेस गंभीर दुखापत झाल्याचा प्रकार घडला आहे. सत्यशिला तुकाराम किर्वे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे
याप्रकरणी एसटी चालक उदय रमेश शिंदे याच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सत्वशिला किर्वे आणि त्यांची बहिण बेबी महादेव राऊत अशा दोघी एसटी बस क्रमांक एमएच ०६ एस ८१८४ हिचे मधून खाली उतरुन चालत पुढे जात होत्या. त्यावेळी सदर बसचे चालक उदय शिंने यांनी त्यांचे ताब्यातील एसटी बस निष्काळजीपणे , हयगयीने चालवून सत्वशिला किर्वे यांच्या उजव्या खांद्याला धडक दिली. त्या जमीनीवर खाली पडल्यानंतर त्यांच्या डाव्या पायाच्या घोटेयावरुन एसटीचे पुढील चाक जाऊन त्यांना गंभीर दुखापत करणेस कारणीभूत झाला आहे. याबाबत स्वारगेट पोलिस पुढील तपास करत आहे.