अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील ४२ वर्षीय महिला यांना कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी ९ जून रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगिता सुनिल गोसावी वय ४२ रा. जवखेडा ता. अमळनेर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, योगीता गोसावी या महिला आपल्या कुटुंबासह अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे वास्तव्याला होते. रविवारी ९ जून रोजी दुपारी २ वाजात घरात एकट्या असतांना त्यांना पत्र्याचे कुलरमधील विजेचा धक्का लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शेजारी ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेतली. घरातील विद्यूत पुरवठा बंद करून त्यांना तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.