यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील शहरातील गाडगे नगर परिसरात राहणाऱ्या एका महीले अत्यंत विषारी सापाने घरात शिरून दंश केल्याने तिचा मृत्यु झाल्याची घटना घडली असुन, या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातीत साने गुरुजी माध्यमीक विद्यालयाच्या मागे असलेल्या गाडगे नगर वस्तीत राहणारी निर्मलाबाई शंकर वडर वय५६ वर्ष हे दिनांक २२ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आपल्या घरात असतांना अचानक त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या मध्यभागी अत्यंत विषारी सापाने दंश केल्याने त्या बेशुद्ध पडत्यात कुंटूबातील मंडळीच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांना नरेन्द्र शिंदे व इतर समाज बांधवांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असतांना डॉ प्रशांत जावळे यांनी तपासणी करून सर्पदंश झालेल्या निर्मलाबाई वडर यांना मृत घोषीत केले.
मयत निर्मलाबाई वडर यांच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची खबर मयताचा मुलगा रवीन्द्र शंकर वडर वय३० वर्ष यांनी यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेन्द्र पवार हे करीत आहे .