रस्त्यावरील पावसाच्या पाण्यात विद्युत प्रवाह आल्याने शॉक लागून महिलेचा मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात पावसाच्या पाण्यात विद्युत रोहित्राची तार पडल्याने विद्युत प्रवाह पाण्यात उतरला होता. ही बाब लक्षात न आल्याने एका महिलेचा पाय पाण्यात पडल्याने तिचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री घडली.

पुण्यात रविवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. तब्बल तीन ते चार तास हा पाऊस सुरू होता. वडगाव शेरी, कोंढवा, हडपसर, सुस, पाषाण, शिवाजी नगर परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जागोजागी पाणी साठले होते. कोंढवा येथे राहणाऱ्या महिलेच्या घराबाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. येथे जवळच विद्युत रोहीत्र असून येथील एक तार ही पाण्यात पडली होती. त्यामुळे पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता. पाऊस कमी झाल्यानंतर ही महिला बाहेर पडली.

डीपीमधून विद्युत तारा बाहेर आल्या होत्या. या तारा रस्त्यावर साठलेल्या पाण्यात पडल्याने संपूर्ण परिसरात विद्यूत प्रवाह पसरला होता. या बद्दल महिला अनभिज्ञ होती. तिने पाण्यात पाय ठेवताच या तारांचा स्पर्श महिलेला झाला. यामुळे तीव्र शॉक बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील दोष दिला जात आहे.

Protected Content