जळगाव येथे कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यु

jalgaon 1

 

जळगाव प्रतिनिधी । पत्नीच्या आजाराच्या निदानासाठी भुसावळहून जळगाव येथे दुचाकीने येत असलेल्या दाम्पत्याच्या वाहनाला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने धडक दिली. ही धडक इतका जोरात होती की, यात महिला जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास दूरदर्शन टावर जवळ घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, नजमाबी शेखचांद पिंजारी (वय-52) हे आपले पती उस्मान पिंजारी (वय-60) रा. भुसावळ हे दांपत्य भुसावळातील चाड येथे राहतात. नजमाबी यांना शुगरचा त्रास असल्याने आजाराच्या निदानासाठी जळगाव येथे दुचाकी (क्रमांक एमएच 19 सीसी 7179) हे जळगाव येथे येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टावर समोर मागुन येणाऱ्या कंटेनर (क्रमांक एचआर 56 ए 8549) ने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीवर बसलेल्या नजमाबी ह्या कंटेनरच्या मागच्या चाकात येऊन त्यांच्या जागीच मृत्यु झाला आहे. तर शेखचाँद उस्मान पिंजारी हे गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली असून महिलांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. त्यांच्या पश्चात सहा मुली असा परिवार आहे.

Protected Content