भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील बाळद रोड परिसरात राहणाऱ्या 46 वर्षीय महिलेचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, रत्नाबाई मधुकर पाटील (वय-४६) या महिला आपल्या कुटुंबीयांसह भडगाव शहरातील एकविरा नगरात वास्तव्याला आहे. बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी रत्नाबाई पाटील यांचा मृतदेह भडगाव शहरातील तळणी भागातील तलावात त्यांचा पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली की, त्यांचा पाय घसरून पाण्यात पडल्या. याची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. यासंदर्भात भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन वाबळे करीत आहे.