
जळगाव प्रतिनिधी । शहरातील समता नगरमधील एका विवाहितेचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, मीराबाई अशोक पाटील (वय 50, रा. समता नगर) हे आपले पती अशोक सिताराम पाटील (वय 55) यांच्यासह राहतात. आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घरासमोर असलेल्या कंपाऊंडच्या लोखंडी गेटमध्ये उतरलेल्या विजेचा जोराचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. विजेचा धक्का लागल्याचे घरासमोर राहणाऱ्या एका महिलेच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. आजुबाजूचा राहणाऱ्या तरुणांनी डीपीवरील फ्युज काढून त्वरित वीज प्रवाह खंडित केला आणि मृतदेह तेथून उचलला.
समता नगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून डीपी नाही. त्यामुळे समतानगर रहिवाशांचे वीजेअभावी अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. याकडे नगरसेवकांचेही देखील दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजास्तव समता नगर रहिवाशांनी थेट डीपीवरून अवैधरित्या अवैधरित्या वीज कनेक्शन घेतल्या आहेत. परिसरातील सर्व स्थानिक रहिवाशांचे इलेक्ट्रिक वायरी मयत झालेला मिराबाई पाटील यांच्या घरावरून गेलेल्या होत्या. पत्राचे घर तशात पाऊस सुरू असल्यामुळे विजेचा प्रवाह लोखंडी गेटमध्ये उतरला होता.
मयत मीराबाईचा मोठा मुलगा आणि सुन हे वेगळे राहत असल्याने गणेश अशोक पाटील हा कामाला गेला होता. तर सुनबाई माहेरी गेली होती. दुसरा मुलगा योगेश अशोक पाटील हा गुजरातमधील वलसाड येथे नोकरीला आहे. तर मुलगी बालाबाई गजानन पाटील हि जावयासह घरासमोरच राहते. आज सकाळी पती अशोक सिताराम पाटील हे हात मजुरीसाठी कामावर गेले असताना हा प्रकार घडला.