Home क्राईम दहिगावात आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

दहिगावात आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

0
35
death

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथे एका महीलेची आजारास कंटाळुन विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, आज (दि.२९ मार्च) रोजी सकाळी १० वाजेच्यापुर्वी दहिगाव येथील राहणाऱ्या कोकीळाबाई प्रकाश पाटील (वय-६0)वर्ष यांनी आजाराला कंटाळुन नायगाव रोडवरील दहीगाव शिवारातील राजु दगडु पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी मारुन  आत्महत्या केली आहे. याबाबत मयत महीलेचे मेहुणे छन्नु पाटील राहणारे नेरी ता . जामनेर यांनी दिलेल्या महितीनुसार यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस कर्मचारी असलम खान हे करीत आहे.


Protected Content

Play sound