रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेल तालुक्यातील एका गावात राहणारी २५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून जातीवाचक शिवीगाळी करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत महिला ही रावेर तालुक्यातील एका गावात वास्तव्याला आहेत. २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास पिडीत महिला ही प्रांतविधीसाठी गावाजवळील रस्त्यावर गेली होती. त्यावेळी संशयित आरोपी सुरेश बळीराम पाटील याने पिडीत महिलेचा पाठलाग केला आहे. पिडीत महिलेला आडवून अश्लील मागणी केली आणि “तुला किती पैसे लागतील ते देतो, माझ्यासोबत चल” असे म्हणून तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने या प्रकाराला कडाडून विरोध केला असता, आरोपीने तिच्या समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि जातीवाचक शब्द वापरून तिचा अपमान केला. “तुमच्या समाजातील स्त्रिया हेच काम करतात,” असे म्हणत तिला मानहानीकारक वागणूक दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने तात्काळ पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.




